Breaking News
उरण ः रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते काँग्रेसचे कट्टर व एकनिष्ठ, प्रामाणिक कार्यकर्ते वैभव नथुराम ठाकूर यांची रायगड जिल्हा काँग्रेस सेवा दल कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचे अधिकृत नियुक्ती पत्र वैभव ठाकूर यांना देण्यात आले. सदर कार्यक्रम टिळक भवन दादर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादालच्या उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर, रायगड जिल्हा सेवा दल जिल्हाध्यक्ष कमलाकर घरत, उरण तालुका सेवा दल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोपीनाथ जी मांडेलकर, रायगड जिल्हा सेवा दल सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील, भेंडखल गावचे उपसरपंच दिपक ठाकूर, काँग्रेस कमिटी ज्येष्ठ नेते नथुराम ठाकूर, एन. एम. घरत यांच्या उपस्थितीत नियुक्त पत्र देण्यात आले.
जसखार गावचे सुपुत्र व काँग्रेसचे एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्ते वैभव ठाकूर हे सामाजिक कार्यकर्ते असून एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काँग्रेसचा तळागाळात प्रचार व प्रसार केला आहे.काँग्रेसच्या माध्यमातून अनेक योजना गोर गरिबांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. बेरोजगारांना नोकरी मिळवून देणे, जसखार ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करणे तसेच उरण तालुक्यातील कबड्डी खेळाडूंसाठी तालुका स्तरीय स्पर्धेचे भव्य आयोजन करणे आदी विविध उपक्रम, कार्यक्रमांचे ते नेहमी आयोजन करीत असतात. त्यामुळे त्यांची निवड रायगड जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या कार्याध्यक्षपदी झाली आहे. उरण काँग्रेस कार्यालयात भिवंडी लोकसभा मतदार संघांचे माजी खासदार सुरेश टावरे, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील आदी काँग्रेसच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. वैभव नथुराम ठाकूर यांची रायगड जिल्हा काँग्रेस सेवा दल कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai