Breaking News
नवी मुंबई ः 2024 वर्षाअखेरीपासून नवी मुंबई अतिक्रमण विभागाने नोटिशीची दखल न घेतलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईचा हातोडा उगारला आहे. बेलापुर ते ऐरोली विभागातील अनेक बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. या आठवड्यात कोपरखैरणे व वाशी विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत रूम नं. 23, सेक्टर-15, व एस.एस. टाईप, रूम नं. 678, सेक्टर-15, यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर तोडक कार्यवाही करण्यात आली. त्यापैकी रूम नं. 23 यांचेकडून अनधिकृत बांधकाम हटविणेपोटी दंडात्मक शुल्क रू.10,000 पावती वसूल करण्यात आले आहेत. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
ठाणे बेलापूर रोड कोपरखैरणे ब्रीज खालील 19 बेघर लोकांचे सामान जप्त करून डपिंग येथे जमा करण्यात आले. तसेच सेक्टर-19,20 व कोपरखैरणे गाव येथील शाळा परिसराच्या 100 मीटरच्या आत तंबाखू/पानविक्री/गुटखा विक्री करणाऱ्या 03 टपऱ्यांचे सामान जप्त करून डपिंग येथे जमा करण्यात आलेले आहे. या माहिमेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोपरखैरणे, औदूंबर पाटील, त्यांचे विभागाकडील पोलिस उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी अंतर्गत युनिट क्र. एस.एस/3-227, सेक्टर- 02, वाशी, यांचे इमारतीचे बांधकाम नवी मुंबई पालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु होते. सदर अनधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले असल्यामुळे 12 डिसेंबर 2024 रोजी सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत तोडक मोहिमच आयोजन करुन ते अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच संबंधितांकडून रु.25,000 दंड ही वसुल करण्यात आला होता. तदनंतर संबंधितांनी पुन्हा काम सुरु ठेवल्यामुळे 6 जानेवारी 2025 रोजी सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत पुन्ह:श्च तोडक मोहिमच आयोजन करुन बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच संबंधितांकडून रु.10,000 दंड ही वसुल करण्यात आलेला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai