Breaking News
2 आरोपी अटक ; नेरुळ पोलीसांची कामगिरी
नवी मुंबई ः चार चाकी वाहने जास्तीच्या भाड्याने मोठ्या कंपनीमध्ये लावतो असे आमिष दाखवून वाहने भाडेतत्वावर घेऊन परस्पर तिर्हाईत व्यक्तीकडे गहान ठेवून फसवणुक करणार्या दोघांना नेरुळ पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून अपहार केलेल्या 2 कोटी दहा लाख किमंतीच्या तब्बल 31 चारचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
शहरात वाहन चोरी तसेच नागरिकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढल्याने असे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ पोलीसांनी संबंधित गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांची चारचाकी वाहने जास्तीचे भाडे देण्याच्या आमिषाने मोठ्या कंपनीत लावतो असे सांगून आरोपी ती वाहने घेऊन पहिल्या एक दोन महिन्यांचे भाडे वेळेवर त्यांचा विश्वास संपादन करत असत. कालांतराने ही भाडेतत्वावर घेण्याच्या बहाण्याने सर्व वाहने तिर्हाईत व्यक्तीकडे गहाण ठेवून वाहन मालकांची फसवणुक करुन ते पळून गेले होते. गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे अनेक दिवस पाळत ठेवून 26 जुलै रोजी रात्री अंधेरी परिसरात सापळा रचुन आरोपी छोटेलाल उर्फ राजेश शर्मा (54) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करुन त्याचा साथीदार हरिदास शिलोत्रे उर्फ पाटील (40) याला चेंबुर येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडे कौशल्यपुर्ण तपास करुन सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी अपहार केलेली 2 कोटी 10 लाख रुपये किंमतीची 31 चारचाकी वाहने पोलीसांनी महाराष्ट्रातून व परराज्यातून जप्त केली आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai