Breaking News
सर्व विभागांनी साध्य केली 100 टक्के उद्दिष्टपूत ; पाणीदेयकेही ऑनलाईन उपलब्ध होणार
नवी मुंबई ः महापालिकेकडे मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी प्रस्ताव, परवाना शुल्क अशा विविध बाबींमधून जमा होणाऱ्या महसूलातूनच नागरी सेवासुविधांची परिपूत केली जात असते. याकरिता सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे करवसूलीची बहुतांशी प्रमाणात उद्दीष्टपूत झाली असून त्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत.
मालमत्ता कर विभागाने 826.12 कोटी इतका मालमत्ता कर जमा केला असून त्यामध्ये अभय योजनेव्दारे थकीत मालमत्ताकरावरील शास्ती रकमेवर 50 टक्क्यांच्या सूटीचा लाभ घेत 20.97 कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहे व तितक्याच रक्कमेची सवलत थकबाकीदारांना झाले आहे. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा विभागामार्फत 105.93 कोटी इतकी रक्कम जल देयकांमार्फत जमा झालेली आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आलेल्या अभय योजनेचा लाभही नागरिकांनी मोठया प्रमाणावर घेतला. नगररचना विभागामार्फत बांधकाम परवानगी पोटी 381.90 कोटी इतके शुल्क जमा झाले असून यामध्ये पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावांच्या मंजूरीचा मोठा भाग आहे. परवाना विभागानेही विविध परवानग्या विहित वेळेत दिल्याने 14.60 कोटी इतकी प्रत्यक्ष शुल्क जमा झालेली आहे. स्थानिक संस्था करापोटीही 28.04 कोटी जमा झालेली आहे. तसेच इतरही विभागांमध्ये महसूल जमा होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. सर्व विभागांनी 100 टक्के उद्दिष्टपूत साध्य केली असून हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागप्रमुख व त्या त्या विभागांचे अधिकारी कर्मचारी यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्वाचे आहेत. या सर्वच अधिकारी कर्मचारीवृंदाच्या उल्लेखनीय कामाची आयुक्तांनी प्रशंसा केली आहे. ही उद्दीष्टपूत होण्यामागे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रत्येक विभागाच्या आहे.
नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत मालमत्ताकर भरावा यासाठी थकीत मालमत्ताकरावरील शास्ती रकमेवर 50 टक्क्यांची सूट देणारी अभय योजना जाहीर करण्यात आली. अशीच अभय योजना पाणी देयकांसाठीही राबविण्यात आली. नागरिकांसाठी सुट्ट्यांच्या दिवशी देयक भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली. या सर्वांचा लाभ नागरिकांनी मोठया प्रमाणावर घेतला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai