विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 02, 2025
- 418
प्रश्न फाउंडेशनमार्फत तेरणा विद्यालयात उपक्रम
नवी मुंबई ः वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणत गेली दोन वर्षे प्रश्न फाउंडेशन मार्फत मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा, सांगली अशा विविध जिल्ह्यात 3000 पेक्षा जास्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे काम यशस्वीरित्या सुरु आहे. हे सुरु असतानाच (सिडबॉल) बीजगोळे बनवण्याचा आणि विविध जिल्ह्यातील डोंगराळ भागात ते बीजगोळे टाकून वनराई नैसर्गिक रित्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नुकतेच त्यांनी नेरुळ येथील तेरणा विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन 28000 बीजगोळे तयार केले.
प्रश्न फाउंडेशनतर्फे पर्यावरणपुरक कामांसाठी बीजगोळे संदर्भात विविध उपक्रम राबविले जातात. माती, खत आणि बिया एकत्र करून तयार केलेले हे गोळे असतात, जे झाडे उगवण्यासाठी मदत करतात. प्रश्न फाउंडेशनद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन बीजगोळे बनवून ते वाटप केले जातात जिथे झाडे लावणे शक्य नाही तेथे ते बीजगोळे टाकुन पर्यावरण संवर्धनास हातभार लावला जातो. 2024 ह्या वर्षात 50000 बीज गोळे तयार करून यशस्वीरित्या टाकल्यावर 2025 म्हणजेच आताच्या वर्षात नेरूळ नवी मुंबई मधील तेरणा विद्यालय, ह्या शिक्षण संकुलातील पहिली ते सातवी इयत्तेतील 177 विद्यार्थांना बीजगोळे बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या मदतीने 28000 बीजगोळे तयार करून पर्यावरणाविषयी योगदान दिले.
प्रश्न फाउंडेशन मार्फत राबवल्या जाणाऱ्या ह्या उपक्रमाबाबत शाळेच्या मुख्यधापिका मधुवंती काटवडे मॅडम आणि शिक्षक संतोष खांडगे सर म्हणतात ‘प्रश्न फाउंडेशन मार्फत राबवला जाणारा हा उपक्रम पर्यावरण पोषक आहे. विद्यार्थ्यांना मातीशी जोडणारा हा उपक्रम आम्ही दरवर्षी शाळेत राबवू ह्यात शंका नाही. उपक्रमात आयोजन आणि नियोजनाची धुरा सांभाळणारे संस्थेचे अध्यक्ष सूरज उत्तम बिडगर ह्यांनी तेरणा विद्यालय शिक्षण संकुलाचे आभार मानले. येत्या काळात विविध शिक्षण संस्था तसेच सामाजिक संस्थानी ह्या बीजगोळे बनवण्याच्या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन केले. विशेष म्हणजे प्रश्न फाउंडेशन ही संस्था सुरू करणारे विद्याथ हे तेरणा विद्यालय ह्या शाळेचे माजी विद्यार्थी आपलं दैनंदिन दिवसातील काम सांभाळून ही तरुण मंडळी हे सामाजिक उपक्रम राबवत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai