Breaking News
नवी मुंबई ः महापे येथील एल अँड टी कंपनीत औषध फवारणीचे काम करणार्या विनोद विष्णू भोईटे (45) या कामगाराच्या अंगावर पाचव्या मजल्यावरून लोखंडी अँगल पडल्याने झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गत शुक्रवारी घडली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार धरून कंत्राटदार व कंपनीच्या सुपरवायझरविरोधात निष्काळजीचा गुन्हा दाखल केला.
भोईटे हे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील सानपाडा नागरी आरोग्य केंद्रात औषध फवारणी कामगार म्हणून कार्यरत होते. भोईटे हे महापालिकेचे काम संपल्यानंतर खासगी कंत्राटदारामार्फत एल अँड टी कंपनीत काम करत होते. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार धरून कंत्राटदार व कंपनीच्या सुपरवायझरविरोधात निष्काळजीचा गुन्हा दाखल केला. तर, संबंधित कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भोईटे कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. मात्र कंपनीकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारावर नेऊन ठेवला होता.
ठाण्यात राहणारे विनोद भोईटे हे नवी मुंबई महापालिकेच्या सानपाडा नागरी आरोग्य केंद्रात औषध फवारणी कंत्राटी कामगार म्हणून औषध फवारणी कामगार म्हणून कार्यरत होते. तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नसल्याने भोईटे हे पालिकेचे काम संपल्यानंतर खासगी कंत्राटदारामार्फत विविध ठिकाणी काम करत होते. शुक्रवार, 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ते राहुल कन्स्ट्रक्शनचे अमर कांबळे यांच्यासोबत महापे येथील एल अँड टी कंपनीत औषध फवारणीचे काम करण्यासाठी गेले होते. यावेळी कंपनीत पाचव्या मजल्याच्या सिलिंगच्या व सहाव्या मजल्याचे फ्लोअरिंगवर लोखंडी अँगल टाकण्याचे काम सुरु असताना, भोईटे यांच्या अंगावर अँगल पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांना वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कंपनीच्या सुपरवायझर व कामगारांनी कामाच्या ठिकाणी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार धरून राहुल कन्स्ट्रक्शनचे अमर कांबळे व कंपनीचे सुपरवायझर व कामगारांविरोधात निष्काळजीचा गुन्हा दाखल केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai