Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिकेस देशात तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहेच. मात्र यापुढील काळात ते मानांकन उंचाविण्यासाठी आपली जबाबदारीही वाढली असल्याचे मत व्यक्त करीत महापालिका राजेश नार्वेकर यांनी या आधीच्या काळात तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या काळात चांगले काम झाले. त्यामुळे आपला बेंचमार्क सेट झाला असून आता त्यापुढे जाऊन प्रगती करण्यासाठी आपण प्रत्येकजण संपूर्ण क्षमतेने काम करेल असा विश्वास व्यक्त केला.
नवनियुक्त आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ापालिका अधिकार्यांची विशेष बैठक घेत पहिल्याच बैठकीत विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे यांच्या हस्ते अधिकारी वर्गाच्या वतीने आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेस नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या स्वच्छ अमृत महोत्सवात मिळालेल्या देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे सन्मानचिन्ह, कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग मानांकनाचे सन्मानचिन्ह तसेच इंडियन स्वच्छता लीगमध्ये युवक सहभागाचे देशातील प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र या समवेत आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व अधिकारी यांचे समुह छायाचित्र काढण्यात आले. यापुढील काळात आयुक्त राजेश नार्वेकर प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे सविस्तर आढावा घेणार असून विविध विभागांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाची पाहणी करणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai