Breaking News
वाशीत महाविकास आघाडीचे आंदोलन
नवी मुंबई ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी जवळपास 2 वाजताच्या सुमारास कोसळला. 3600 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. या सर्व प्रकरणात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर याविरोधात आज बुधवारी नवी मुंबईतही महाविकास आघाडीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. शिवशिल्पाच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे सकाळी 1130ः वाजता महाविकास आघाडी घटक पक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार नवी मुंबई जिल्हा, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नवी मुंबई, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस नवी मुंबई यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यासाठी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मालवणमधील शिवशिल्पाचा अवमान पाहून प्रचंड वेदना होत आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्यांना आता जाब विचारायलाच हवा असा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai