Breaking News
विजय नाहटा, चौगुलेंसह आमले व कदम यांनी अर्ज मागे न घेता कायम ठेवले
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळालेल्या ईच्छुकांनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज भरला होती. 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. मात्र यादिवशी बेलापुर आणि ऐरोली या दोन्ही मतदार संघात शिंदेच्या शिवसेनेचे विजय चौगुले व विजय नाहटा यांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न घेता बंडखोरी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता दोन्ही मतदार संघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारापुढे या दोन्ही अपक्षांचे तगडे आवाहन उभे ठाकले आहे.
150-ऐरोली विधानसभा आणि 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने उभी फूट पडली आहे. महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेचे विजय चौगुले व विजय नाहटा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोघांनीही अर्ज मागे न घेता बंडखोरी कायम ठेवली आहे. बेलापूर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेल्या माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी माघार घेतली आहे. सकल मराठा समाजाने निवडणुकीतून माघार घेतल्याने मराठा समाज बांधव अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले विनोद पोखरकर व डॉ.अमरदीप गरड यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत होणार असून महायुती आणि महाविकास आघाडी समोर मातब्बगार नाराज अपक्ष नेत्यांचे आवाहन असणार आहे.
ऐरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीतील (भाजप) गणेश नाईक, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम, महाविकास आघाडीतील (उबाठा) मनोहर मढवी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निलेश बाणखेले, अपक्ष उमेदवार विजय चौगुले (निशाणी कुकर) यांच्या प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बेलापूर विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीतून बाहेर पडलेले विजय नाहटा अपक्ष (निशाणी शिट्टी), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक, महायुती (भाजप) तील मंदा म्हात्रे,मनसेचे गजानन काळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ.मंगेश अमले यांच्यात सामना रंगणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai