Breaking News
ऐरोली-बेलापुरमधील उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता
नवी मुंबई ः राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरशीची लढाई होत असल्याने सर्वच उमेदवारांनी आपल्या हक्काच्या मतदारांना साद घातलीआहे. या मतदारांना गावी आणण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची सोय केली असून मतदानाच्या एक दिवस आधीच मतदानासाठी नेण्यात येणार आहे. यामध्ये सातारा, सांगली, कराड भागातील मतदारांचा समावेश असून सुमारे 20 हजार मतदार गावी जाणार असल्याने त्याचा फटका ऐरोली-बेलापुरमधील उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. राज्याच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर दुबार नावे असल्याने वेगवेगळ्या दिवशी मतदान असल्यास मतदार दोनवेळा आपला मतदानाचा हक्क बजावत असत. मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात (पान 7 वर)
महापालिका निवडणुकीत आपले नशीब आजमावणारे अनेक पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांचा विजय सुकर व्हावा म्हणून गावाकडच्या मतदारांची नोंदणी येथील मतदारयादीत केली आहे. दरवेळी हे मतदार लोकसभा, विधानसभा व महापालिकांच्या निवडणुकीत दुबार मतदानाचा हक्क्क बजावतात. मात्र पहिल्यांदाच राज्यात एकाच दिवशी मतदान होत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांनी आपल्या या हक्काच्या उमेदवारांना गावी येऊन मतदान करण्याचे साकडे घातलेआहे.
ऐरोली-बेलापुर मतदारसंघात कराड, सातारा, सांगली येथील अनेक चाकरमानी माथाडी कामगार म्हणून काम करतात. नेरुळ, सानपाडा, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली व दिघा परिसरात सुमारे 20 हजारहुन अधिक माथाडी कामगार राहत आहेत. या माथाडी कामगारांची नाळ त्यांच्या गावाकडच्या मुळ आमदारांशी जोडलेली असल्याने ते यावेळी मतदानासाठी गावी जाणार असल्याची चर्चा आहे. या मतदारांना गावी नेण्यासाठी सर्वच उमेदवारांनी बसेस, गाडया यांची सोय केली असून एकदिवस आधीच सर्वांना गावी आणण्याची रणनिती आखली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर माथाडी कामगार गावी परतले तर त्याचा फटका ऐरोलीत चौगुले यांना तर बेलापुरमध्ये संदीप नाईक यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावी मतदानासाठी जाणाऱ्या लोकांचे मतपरिवर्तन करण्याची कसरत स्थानिक उमेदवारांना करावी लागणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai