Breaking News
नवी मुंबई ः भगवान श्री सत्यसाई बाबांच्या जन्मदिनानिमित्त श्री सत्यसाई ट्रस्ट महाराष्ट्र आणि श्री सत्यसाई सेवा संघटना (म.प.) नवी मुंबई जिल्हा तर्फे 17 नोव्हेंबर रोजी मोफत वैद्यकिय चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे.
दरवष भगवान श्री सत्यसाई बाबांच्या जन्मदिनानिमित्त सदर संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मोठ्या संख्येने भक्तीभावाने नागरिक सहभागी होऊन कार्यक्रमांची शोभा वाढवतात. समाजपयोगी कार्यक्रमातून नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येते. नागरिकांच्या आरोग्यासाठी यावष वैद्यकिय चिकित्सा शिबीराचे आयोजन केले आहे. 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत श्री सत्यसाई ट्रस्ट साईप्रेम साईबाबा मंदीर, प्लॉट नं. 13 अे, सेक्टर 10 अे, बालाजी मंदिरजवळ, वाशी, येथे हे शिबीर पार पडणार आहेत. यामध्ये नाक-कान-घसा, दात, डोळे, त्वचा, हाडे, सांधे, हद्यविकार व सर्वसाधारण आरोग्य इं समस्यांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत रक्त तपासणी करुन शिबीरार्थिंना योग्य विनामुल्य सल्ला देण्यात येणारआहे. तसेचॲलोपथी, होमिओपथी, आयुर्वेद, फिजिओथेरपी इ उपलब्ध औषधोपचार केले जातील. या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai