Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिका कार्यक्षेत्रात खानावळी, हॉटेल, उपहारगृहे, लॉजिंग बोर्डींग, स्वीट मार्ट, केक शॉप, आईस्क्रिम पार्लर, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर या सर्व व्यवसायिकांचे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376 अन्वये देण्यात आलेल्या व्यवसाय परवान्यांचे नुतनीकरण दरवष करण्यात येते. व्यवसाय परवाना नुतनीकरणासाठी 31 डिसेंबर 2024 पूव ऑनलाईन अर्ज स्वतः सादर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. विहित कालमर्यादेनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना / व्यावसायिकांना परवाना देण्याची व त्यांचे नुतनीकरण करण्याची प्रक्रिया पारदश व सुलभ करण्याकरिता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या व्यावसायिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडून कलम 376 अन्वये व्यवसाय परवाना घेतलेला आहे आणि ज्या व्यावसायिकांनी घेतलेल्या व्यवसाय परवान्याची कालमर्यादा संपुष्टात आलेली आहे, अशा सर्व व्यावसायिकांनी व्यवसाय परवाना नुतनीकरण करणे आवश्यक आहे. व्यवसाय परवाना नुतनीकरण 2025 साठी संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह ुुु.ीीींपाालेपश्रळपश.लेा किंवा नमुंमपाचे संकेतस्थळावरील सुविधेचा वापर करून ऑनलाईन अर्ज 31 डिसेंबर 2024 पूव स्वतः सादर करावेत. विहित कालमर्यादित परवान्याचे नुतनीकरण केले नाही तर परवाना धारकावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 392, 468 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. व्यवसाय परवाना नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376 अनुसार ऑनलाईन पध्दतीने परवाना नुतनीकरणाची कार्यवाही करण्यात येईल. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकांनी त्वरीत परवाना नुतनीकरण करुन घ्यावे, असे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai