Breaking News
नवी मुंबई ः शहरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. घरगुती स्तरावर विराजमान बाप्पांची संख्या मोठी होती. संपूर्ण महापालिका क्षेत्रात एकूण 1275 श्रीमूर्तींचे विसर्जन झाले. त्यामध्ये कृत्रिम विसर्जन तलावात 582 पीओपीच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे 693 शाडू मातीच्या श्रीमूर्तींपैकी 34 श्रीमूर्तींचे कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन करण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या 30 जानेवारी 2025 रोजीच्या आदेशानुसार राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री करण्यास बंदी असून त्या पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक तलावांमधील विसर्जनासाठी बंदी आहे. त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात माघी गणेशात्सवातील श्री मूत विसर्जनासाठी ठिकठिकाणी 26 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली होती. पीओपीच्या श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे असे जाहीर आवाहन करण्यात आले होते व त्याच्या अंमलबजावणीसाठी परिमंडळ उपआयुक्तांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त आणि त्यांची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. संपूर्ण पालिका क्षेत्रात 1275 श्रीमूर्तींचे विसर्जन झाले. त्यामध्ये कृत्रिम विसर्जन तलावात 582 पीओपीच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे 693 शाडू मातीच्या श्रीमूर्तींपैकी 34 श्रीमूर्तींचे कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन करण्यात आले. 659 शाडू मातीच्या श्रीमूत हया महापालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन तलावात विसर्जित करण्यात आल्या. यामध्ये कृत्रिम विसर्जन तलावात बेलापूर विभागात 120 पीओपी मूत, नेरुळ विभागात 41, वाशी विभागात 114, तुर्भे विभागात 118, कोपरखैरणे विभागात 7, घणसोली विभागात 97, ऐरोली विभागात 78 व दिघा विभागात 7 अशा प्रकारे 8 विभागांत 26 कृत्रिम विसर्जन तलावांवर 582 पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
पालिकेकडून सर्वच नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. विदयुत व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती. विसर्जन स्थळावरील ओले व सुके निर्माल्य लगेच उचलून नेण्यासाठी निर्माल्य वाहतूक वाहने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.अयज गडदे व श्री.संतोष वारुळे यांच्या नियंत्रणाखाली सज्ज होती. चोख व्यवस्थेमुळे महानगरपालिका क्षेत्रातील माघी गणेशोत्सव गणेशमूत विसर्जन सोहळा सुनियोजित पध्दतीने निर्विघ्नपणे पार पडला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai