Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबई पालिकेच्या सेवेतून माहे डिसेंबर 2024 मध्ये सेवानिवृत्त झालेले 10 व स्वेच्छानिवृत्ती स्विकारलेले 1 अशा एकूण 11 अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद तसेच माहे जानेवारी 2025 मध्ये 6 अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद सेवानिवृत्ती झाले. त्यांचा सन्मान पालिकेच्या वतीने करण्यात आला. पहिल्या फळीतील अनुभवसंपन्न अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होणे म्हणजे एक प्रकारे संस्थेचा तोटा असल्याचे मत व्यक्त करीत प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार यांनी सेवानिवृत्तांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रत्येकाने आपापल्या पदाला साजेशा सेवा उत्तम रितीने बजावल्या त्यामुळे आपण सारेजण अत्यंत समाधानाने निवृत्ती स्विकारत आहात याचा आनंद व्यक्त करीत अनेक शासकीय कार्यालयात कामकाज केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी अधिक समर्पित भावनेने काम करतात असा स्वानुभव उपायुक्त शरद पवार यांनी सांगितला. यावेळी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण तसेच इतरही कर्मचा-यांनी आपल्या सेवानिवृत्त होणाऱ्या सहकाऱ्यांविषयी आपुलकीच्या भावना व्यक्त केल्या. सत्कारमूत कर्मचाऱ्यांनीही मनोगते व्यक्त करीत सत्काराबद्दल आभार मानले.
माहे डिसेंबर 2024 महिन्यात सेवा निवृत्त झालेले कार्यकारी अभियंता सुभ्राष सोनवणे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे, मुख्याध्यापिका रंजना वंशा, प्राथमिक शिक्षिक श्रीम.रोहिणी आवटे, वरिष्ठ लिपिक विश्वास कोळेकर, आरोग्य सहाय्यक पुजा वारके, वाहनचालक विठ्ठल जाधव, शिपाई श्री.बाळासाहेब कांबळे, मदतनीस गणेश नाईक, सफाई कामगार बालाजी सूर्यवंशी तसेच स्वेच्छानिवृत्ती स्विकारलेल्या शिपाई जया पाटील यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच जानेवारी 2025 महिन्यात सेवानिवृत्त होत असलेले प्रशासकीय अधिकारी विलास मलुष्टे, मुख्याध्यापिका सुनंदा डोके, मुख्याध्यापक संजय मोरे, माहिती नोंदणीकार भारती देशमुख, वाहनचालक भरत बहाडकर, क्लीनर/सफाई कामगार सुनिल गायकवाड यांनाही सन्मानित करण्यात आले.