Breaking News
नवी मुंबई ः संविधान दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावष भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा होत आहे. संविधानाचे आपल्या जीवनात अतिशय महत्व असून संविधानामुळे आपल्याला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळालेले आहेत. त्यामुळे घटनेतील तत्वांचा आपण जीवनात अंगिकार केला तर आपला देश अधिक सक्षम, सुदृढ बनेल व प्रभावी लोकशाही राबविणारा देश म्हणून जगभरात अधिक नावलौकिक मिळवेल असे आयुक्तांनी सांगितले.
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्विकृत करुन 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्त्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत संविधान महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे संविधान अमृत महोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. आज संविधान दिनानिमित्त नवी मुंबई महानगरापालिका मुख्यालयासह महानगरपालिकेची आठ विभाग कार्यालये व इतर कार्यालये तसेच शाळांमध्येही संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी 26 /11/ 2008 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, जवान, नागरिक यांनाही भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai