Breaking News
उत्तम दर्जेदार पूर्व शालेय शिक्षण कार्यक्रम
नवी मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य अंतर्गत पोषण भी पढाई भी हा केंद्रपुरस्कृत कार्यक्रम निपसिडमार्फत राबविण्यात येत आहे. बालकांचे पोषणासह अंगणवाडीतील पूर्व शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे या उद्देशाने 10 मे 2023 या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पोषण भी पढाई भी अंतर्गत अंगणवाडीतील बालकांना उत्तम दर्जेदार पूर्व शालेय शिक्षण देण्याकरिता व अंगणवाडी केंद्र हे एक अध्ययन केंद्र/शिकण्याचे केंद्र व्हावे याकरिता अंगणवाडी कार्यकत-अधिकारी कर्मचारी यांचे क्षमतावर्धन करण्यात येत आहे. याअंतर्गत 0 ते 3 वर्षे वयोगटाकरिता नवचेतना व 3 ते 6 वर्षे वयोगटाकरिता आधारशीला या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका मुख्यसेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना देण्यात येत आहे. आधारशीला या अभ्यासक्रमात मुलांच्या शारिरीक व कारक, बौध्दिक, भाषा विकास, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, सामाजिक-भावनिक विकासासाठी विविध कृती समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच नवचेतना या अभ्यासक्रमात बालकाच्या बौदिधक विकास, पंचज्ञानेंद्रियांच्या विकासासाठी उद्दिपनाच्या कृतीवर भर दिला आहे. बालकाच्या मेंदूचा 80% विकास ते 6 वर्षे वयोगटात होत असतो. वास्तव अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांना खेळ आधारित कृतीयुक्त, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यात येत असून औपचारिक शाळेसाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे.
याअंतर्गत आतापर्यंत राज्यातील 1886 पर्यवेक्षिका/मुख्यसेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचे राज्य स्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सदर प्रशिक्षक अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देणार आहेत. त्याअनुषंगाने 15 जिल्ह्यातील 37000 अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण माहे नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.25 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत अमरावती, जळगाव, गडचिरोली व अहिल्यानगर या 4 जिल्ह्यामध्ये 31 बॅच मध्ये 3100 अंगणवाडी सेविका यांना सदर प्रशिक्षण देण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai