Breaking News
नवी मुंबई ः नमुंमपा कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल, विधवा, निराधार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार व मागासवगय घटकातील इ.1ली ते महाविदयालयीनपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे हि योजना ऑनलाईन पध्दतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता राबविण्यात येत आहे.
उक्त योजने अंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणेकरीता दि.30/11/2024 पर्यंत प्रथम मुदत वाढ देण्यात आलेली आहे. तथापी विदयार्थ्यांची मागणी लक्षात घेता उक्त योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणेकरीता 15/12/2024 रोजी पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात येत आहे. याची कृपया सर्व संबधितांनी नोंद घ्यावी. तरी महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा महानगरपालिका क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai