Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने सातत्याने महिला, बालके, मागासवगय घटक, ज्येष्ठ नागरिक अशा विविध समाज घटकांसाठी कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात येत असतात. याच धतवर दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने महिला व बालकांसाठी उपयोगी उपक्रम राबविण्यात आले. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.
दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण असून तो सर्वत्र अतिशय उत्साहात साजरा होतो. दिवाळी आणि फराळ यांचे एक वेगळे नाते आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले फराळाचे पदार्थ व साहित्य यांच्या विक्रीसाठी विभागनिहाय स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले होते. यामध्ये दिवाळी फराळाचे विविध पदार्थ, उटणे, आकाश कंदील, दिवे व पणत्या असे विविध साहित्य विक्रीकरिता महिला बचत गटांना आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी तात्पुरते स्टॉल उभारून ते माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आले. 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत नागरेिकांनी आपापल्या विभागातील स्टॉलला भेटी देऊन दिवाळी साहित्य खरेदी केले. या माध्यमातून 42 महिला बचत गटांना त्यांनी उत्पादन केलेल्या सांहित्याला बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण झाले.
अशाच प्रकारे शाळांना दिवाळीची सुट्टी असल्याने या कालावधीत मुलांचा व्यक्तिमत्व विकास व बौध्दिक विकास या दृष्टीने विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका क्षेत्रात उच्चभ्रू नागरिक सुट्टीच्या कालावधीत आपल्या मुलांना शुल्क भरुन वेगवेगळया शिबीरांमध्ये सहभागी करुन घेतात. तथापि सर्वसामान्य मध्यमवगय मुले अशा शिबीरांपासून वंचीत राहतात. अशा मुलांना शिबीरांत सहभागी होण्याची संधी मिळावी यादृष्टीने नमुंमपा समाजविकास विभागामार्फत 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 4 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत विनामूल्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये पुस्तक वाचन वर्ग, योगा व फिटनेस वर्ग, हस्तकला वर्ग, वक्तृत्व विकास, चित्रकला वर्ग, व्यक्तीमत्व विकास, नृत्य वर्ग घेण्यात आले. दिघा ते बेलापूर अशा आठही विभागांतील मुलांना संधी मिळावी अशाप्रकारे विभागातील मध्यवत आठ महापालिका शाळांमध्ये हे शिबीर घेण्यात आले. शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. 769 विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे धडे घेतले. या शिबीरामुळे स्वत:मधील गुण ओळखता आले व याचा उपयोग आम्हाला यापुढे होईल असे सहभागी मुलांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या दोन्ही उपक्रमांचा लाभ महिला बचत गट तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणावर घेतला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai