Breaking News
नवी मुंबई ः माहे नोव्हेंबर महिन्यात नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या 9 अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी अतिरिक्त सुनील पवार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
महापालिकेच्या यशात प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या परीने महत्त्वाचा वाटा उचलला आहे. सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातील अपरिहार्य भाग असून सेवा निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या दुसऱ्या डावात आपल्या आवडीचा छंद जोपासा, कुटुंबियांना वेळ द्या व महत्त्वाचे म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या असा शब्दात अतिरिक्त सुनील पवार यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. माहे नोव्हेंबर महिन्यात नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या 9 अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभानिमित्त ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी मंचावर उपस्थित प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण आणि इतर अधिकारी, कर्मचारी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली.
नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणारे लेखा अधिकारी वर्ग 2 दीपक पवार, स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे, मुख्याध्यापक सागरनाथ भंडारी, मुख्याध्यापिका प्रतिभा पांचाळ, सहाय्यक अधिसेविका स्मिता विचारे, सिस्टर इन्चार्ज / नाईट सुपरवायझर विमल वानखेडे, प्लंबर - फिटर नंदकुमार थोरात, शिपाई मधुकर निकम, कक्षसेविका सुमती पवार या सेवानिवृत्त आणि वरिष्ठ लिपिक (लेखा) पुरुषोत्तम घरत अशा स्वेच्छानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai