Breaking News
नवी मुंबई : महाराष्ट्र संशोधन, उन्न्ती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेद्वारे अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या संस्थेच्या आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ठरविण्यात आलेल्या लक्षित गटाच्या 18 ते 60 वयोगटातील उमेदवारांना ‘प्रथम येयील त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर प्रवेश मिळण्याकरीता अमृतच्या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अशी माहिती अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी दिली.
आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमातून लाभार्थ्यांची वैयक्तिक तसेच कौटुंबिक आर्थिकस्थिती सुधारणे, स्वयंरोजगाची निर्मिती, प्रशिक्षणामार्फत लाभार्थ्यांनी इतर गरजू समाज घटकांची आर्थिकस्थिती सुधारण्यास मदत करावी ही अपेक्षित सकारात्मक उद्दिष्टे लक्षात घेऊन शासनाद्ववारे महाराष्ट्र संशोधन, उन्न्ती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत अव्वल 50 प्रशिक्षणार्थ्यांची प्रमाणपत्र परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या या योजनेचा अभ्यासक्रम हा 1. बेसिक फायनानशिएल सर्व्हिस नॉलेज (2 महिने), 2.प्रोफेशनल ग्रुमिंग आणि प्रोफेशनलिटी डेव्हलपमेंट (1 महिना), 3. मार्केट ॲपलिकेशन आणि एम्पॉयब्लिटी स्किल (1महिना) या 3 टप्प्यात असेल. अमृतच्या लक्षित गटातील 18 ते 60 वयोगटाच्या उमेदवारांना या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येईल. प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वाने प्रवेश देण्यात येईल. प्रशिक्षणाचा कालावधी 4 महीने राहील, शिक्षणाची भाषा इंग्रजी आणि मराठी राहील. लाभाथचे पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा पदवी परीक्षा (अंतिम वर्ष) शिक्षण चालू असणे अपेक्षित आहे. लाभार्थ्यांना डिजिटल स्वरूपामध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल.
या अभ्यासक्रमामध्ये म्युचअल फड, एसआयपी, एसडब्ल्यूपी, स्टॉक मार्केट, इंशुरन्स इत्यादी गुंतवणूकी संबंधित माहितीचे ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल. भारतीय रिझर्व बँक, सेबी सारख्या विविध भारतीय वित्तीय संस्थांची माहिती देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणाथ NISM-5A, IRDAI -5, सारख्या प्रमाणन परीक्षे करीता अर्ज करू शकतील. या प्रमाणन परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रशिक्षणाथकरीता सराव परीक्षा घेण्यात येतील. प्रशिक्षणार्थ्यांपैकी पहिल्या अव्वल 50 गुणवंत विद्यार्थ्यांचे NISM-5A, IRDAI -5, या प्रमाणन परीक्षेचे परीक्षा शुल्क हे संस्थे मार्फत बक्षीस स्वरूपी परत देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahaamrut.org.in या ‘अमृत’ संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच https://app.mahaamrut.org.in/amrut/choose-logi या लिंक वर जाऊन अर्ज करावा व आवश्यक ते सर्व कागदपत्र अपलोड करावेत. अमृतच्या आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai