Breaking News
नवी मुंबई ः 03 डिसेंबर म्हणजेच जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून डिसेंबर महिन्यामध्ये समाजामध्ये दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे तसेच दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करणे या हेतूने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच धतवर 9 डिसेंबर रोजी इटीसी केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी वंडर्स पार्क, नेरूळ येथे भेट दिली.
विविध उपक्रमांअंतर्गत 03 डिसेंबर 2024 रोजी दिव्यांगात्वाबाबत जनजागृतीकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याच धतवर 9 डिसेंबर रोजी इटीसी केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी वंडर्स पार्क, नेरूळ येथे भेट दिली. यावेळी दिव्यांग मुलांनी आपल्या पालकांच्या उपस्थितीत वंडर्स पार्क येथील वेगवेगळ्या खेळांचा आणि टॉय ट्रेनचा मनमुराद आनंद घेतला. या भेटीकरिता सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शिकत असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांनाही सामावून घेण्यात आले होते येथे संगीताच्या तालावरील पाण्याचे कारंजे याच्या मनमोहक दृश्याचा मुलांनी आनंद घेतला.
सदर भेटीचे संपूर्ण नियोजन ईटीसी केंद्राद्वारे केंद्र संचालिका तथा उपआयुक्त संघरत्ना खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी ईटीसी केंद्रातील विशेष शिक्षक, निमवैद्यकीय कर्मचारी असा संपूर्ण कर्मचारीवर्ग मुलांसोबत उपस्थित राहून मुलांची सुरक्षितता आणि त्यांना खेळाचा आनंद मिळावा याकरिता दक्ष होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनीही दिव्यांग विद्यार्थ्यांना अशा भेटीतून आनंद मिळावा यासाठी पुढाकार घेत कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. वंडर्स पार्कच्या कर्मचारीवर्गाने दिव्यांग मुलांच्या या भेटीकरता उत्तम सहकार्य केले. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या सहकार्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता वंडर्स पार्क उपलब्ध करून देण्यात आले. सर्व शिक्षा अभियानामधील कर्मचारी वर्गही यावेळी उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai