Breaking News
नवी मुंबई ः प्रतिवष मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती उत्सव देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्त्व नेहमीच्या तुलनेत 1 हजार पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची उपासना जेवढी अधिक करू, तेवढा उपासकाला आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. या अनुषंगाने दत्ताच्या उपासनेसह अध्यात्म, साधना आणि अन्य विविध विषयांवर भाविकांना शास्त्रीय माहिती मिळावी, यासाठी दत्त जयंतीच्या निमित्ताने शनिवार, 14 डिसेंबरला सनातन संस्थेच्या वतीने देशातील अनेक राज्यांत विशेष ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात येणार आहेत. नवी मुंबईत एकूण 6 ठिकाणी ही ग्रंथप्रदर्शने तसेच मुंबई आणि पालघर जिल्ह्यात एकूण 32 ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात येणार आहेत.
या ग्रंथप्रदर्शनांवर दत्तगुरुंच्या नामजपाचे महत्त्व, पूर्वजांचा त्रास दूर होण्यासाठी दत्ताची उपासना का करावी ? दत्तगुरुंनी केलेले 24 गुणगुरु कोणते आणि त्यांच्याकडून ते काय शिकले ? आदी दत्तगुरुंविषयी माहिती देणारे ग्रंथ उपलब्ध असतील. ‘दत्त’विषयक ग्रंथांसह अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य, प्रथमोपचार आदी विषयांवरील ग्रंथ तसेच दत्ताच्या नामजपाच्या पट्टया, दत्ताचे सात्त्विक चित्र यांसह सनातनची सात्त्विक उत्पादने सनातन संस्थेच्या वतीने या ग्रंथप्रदर्शनांवर उपलब्ध असतील.
सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनांची काही महत्त्वाची ठिकाणे : (वेळ : सकाळी 9.00 ते रात्री 9.00 पर्यंत)
1. श्री दत्त मंदिर , सानपाडा गाव
2. श्री दत्तमंदिर, सेक्टर 17, ऐरोली
3. सिताराम स्वामी दत्त मंदिर, सेक्टर 15, नेरूळ
4. श्री दत्त मंदीर, सेक्टर 15 , वाशी
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी तसेच वरील ठिकाणासह अन्य ठिकाणच्या ग्रंथप्रदर्शनाविषयी माहिती हवी असल्यास 9320003560 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai