Breaking News
26 डिसेंबर 2024 पर्यंत करता येणारअर्ज
नवी मुंबई ः सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या 26 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेने 1 लाख अर्जांचा विक्रमी टप्पा गाठला आहे. या योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी 26 डिसेंबर 2024 पर्यंत ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदत संपुष्टात येईपर्यंत नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद कायम राहणार असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. तसेच एक लाख अर्जांचा टप्पा म्हणजे, सिडकोच्या गृहनिर्माण क्षेत्रातील योगदानाचा व विश्वसार्हतेचा जनतेने केलेला गौरव असल्याची प्रतिक्रियाही सिडकोने दिली आहे.
सिडकोतर्फे 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर माझे पसंतीचे सिडकोचे घर या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेंअंतर्गत 26,000 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिकाधिक नागरिकांना योजनेकरिता अर्ज करता यावा व अर्जदारांना आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करता यावी याकरिता योजनेच्या अर्ज नोंदणीस 26 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नोंदणी करताना बारकोड असलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आणि 100 किंवा 500 रु. मूल्याच्या स्टॅम्पपेपरवर नोटरीकृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अटही या पूवच शिथील करण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांना सुरळीतपणे नोंदणी करता आली. आता या योजनेची इकेवायसी नोंदणी 26 डिसेंबरपर्यंत करता येईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai