Breaking News
कोळी बांधव आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावा- आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : छत्रपती शिवरायांच्या आरमारात स्थान असलेला कोळीराजा आज आपल्याच घरात उपरा झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यातील कोळी बांधवांची घरे, कोळीवाड्यांचा पुनर्विकास तसेच त्यांची जागा कायमस्वरुपी करण्यासंदर्भात कोळी बांधव आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी 9 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.
एकीकडे 2011 पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत दर्जा मिळाला; पण शेकडो वर्षे असलेला कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे. त्याचबरोबर एकत्र कुटुंब संस्कृतीमध्ये राहत असलेला समाज सध्या त्यांचे वाढते कुटुंब लक्षात घेता कोळीवाड्यातील घरे आणि जागा कायमस्वरुपी नसल्याने घरांची पुनर्र्बांधणी करताना त्या घरांवर नवी मुंबई महापालिका किंवा सिडको यांच्यामार्फत तोडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे कोळी बाधवांना घरांची पुनर्बांधणी करताना नाहक त्रास होत असल्याचे लक्षात येताच बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी 9 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील कोळी बांधवांची घरे, कोळीवाड्यांचा पुनर्विकास तसेच त्यांची जागा कायमस्वरुपी करण्यासंदर्भात कोळी बांधव आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने 10 डिसेंबर रोजी आ. मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदमध्ये कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासंदर्भातील माहिती दिली. कोळी बांधव आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावून त्याबाबत नियमावली कायद्याच्या चौकटीत बसवून कोळी बांधवांची किचकट नियमांमधून सुटका करुन सदरचा प्रश्न माग लावून कोळी बांधवांना योग्य तो न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याआधी राज्यात काम केलेले असल्याने राज्यातील प्रश्नांची आपल्याला जाण आहे. त्यामुळे शासनाने युध्दपातळीवर कार्यवाही केल्यास त्याचा दिलासा संपूर्ण महाराष्ट्रातील कोळीवाड्यातील बांधवांना मिळणार आहे, असे आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, माजी नगरसेवक दीपक पवार, निलेश म्हात्रे, राजू शिंदे, विकास सोरटे, दत्ता घंगाळे, चिंतामण बेल्हेकर, राजू तिकोने, पांडुरंग आमले, सुरेश अहिवले, दर्शन भारद्वाज, जयवंत तांडेल, मंगेश चव्हाण, प्रवीण भगत, प्रवीण चिकणे, नाना शिंदे, सुधीर जाधव, पंकज पाचपुते, कैलास तरकसे, सुहासिनी नायडू, अश्विनी घंगाळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai