Breaking News
व्हॉट्स ॲप सुविधेसह ग्रीव्हेन्स रिड्रेसल पोर्टलचाही प्रभावी वापर
नवी मुंबई ः महापालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत राहण्याकरिता वार्षिक देखभालीचा करार करण्यात आला आहे. पालिका क्षेत्रातील रस्त्यांबाबतच्या तक्रारी नागरिकांना सुलभतेने नोंदविता याव्यात या दृष्टीने महापालिकेने तक्रार निवारण प्रणालीची अर्थात ग्रीव्हेन्स रिड्रेसल पोर्टलची निर्मिती केली असून नागरिक महापालिकेच्या वेबसाईटवरील पोर्टलवर सहजपणे तक्रार नोंदवू शकतात.
सदर तक्रार नोंदविण्याकरिता 8424949888 हा व्हॉट्स ॲप क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. याशिवाय रस्त्यांवर खड्डे असल्यास त्यांच्या सुधारणेसाठी खड्ड्याची माहिती महापालिकेपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील चौकाचौकात व्हॉट्स ॲप क्रमांक आणि तक्रार निवारण पोर्टलचा तपशील दर्शविणारे फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहे. याव्दारे प्राप्त तक्रारी अभियांत्रिकी विभागाकडील ‘दक्ष ॲप’ च्या माध्यमातून महापालिकेच्या रस्ते दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराकडे त्वरित पाठविल्या जातात व त्यांचे 24 तासाच्या आत निराकरण केले जाते. या तक्रार निवारण प्रणालीव्दारे रस्ते तसेच रस्त्यांशेजारील गटारे व पदपथ यांच्याही तक्रारी प्राप्त होत असतात आणि त्यांचेही निराकरण तत्परतेने केले जाते.
नागरिक आपल्या रस्ते, गटारे, पदपथ या विषयीच्या तक्रारीसाठी 8424949888 तसेच विद्युत विषयक तक्रारीसाठी 8421033099 आणि पाणीपुरवठा विषयक तक्रारीसाठी 84199004801 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर संपर्क साधून छायाचित्रासह आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय 1800222309 / 2310 या दोन टोल फ्री क्रमांकावरही नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात तसेच पालिकेच्या वेबसाईटवरही पोर्टलवरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या नवी मुंबई शहराचा सुनियोजित व गुणवत्तापूर्ण सुविधायुक्त शहर हा नावलौकिक कायम राखण्यासाठी तक्रार निवारण प्रणालीचा सुयोग्य वापर करून संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai