Breaking News
आणखी एक यशस्वी चाचणी
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर वैमानिकांना विमान उतरविण्यावेळी धावपट्टीचा अचूक अंदाज मिळण्यासाठी धावपट्टीवरील दिव्यांच्या मार्गाची अचूक सूचना देणाऱ्या यंत्रणेची चाचणी एका लहान विमानाच्या साह्याने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने (एनएमआयए) गुरुवारी सायंकाळी त्यांच्या समाजमाध्यमांवरील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने गुरुवारी सकाळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवरील 08/26 येथे चाचणी घेण्यात आली. गुरुवारी सकाळी तब्बल दोन तास धावपट्टीवर लहान विमान चाचणीसाठी घिरट्या घालत होते. विमान उतरविण्यासाठी वैमानिकांना धावपट्टीवरील मार्गाचा अचूक संदेश सूचकता दर्शविणाऱ्या दिव्यांचा आधार घ्यावा लागतो. धावपट्टीवरील दिवे मार्गातील अचूक सूचनेमुळे वैमानिकांना धावपट्टीवरील दृष्यमानता कमी असताना याच दिव्यांच्या आधारे विमान उतरवावे लागते. त्यामुळे या चाचणीला विशेष महत्त्व आहे. गुरुवारी ही चाचणी पूर्ण झाल्याने पुढील चार महिन्यात नवी मुंबई विमानतळावरुन विमानाचे उड्डाण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 11 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले लढाऊ विमान सी- 295 हे उतरविण्यात आले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन धावपट्टी आहेत. त्यातील दक्षिण धावपट्टी पहिल्या टप्यात सुरू होणार आहे. या धावपट्टीची 3700 मीटर लांबीची आणि 60 मीटर रुंदीची आहे. पहिल्या टप्यात मालवाहू विमानतळ या विमानतळावरुन सुरू होणार आहे.
चाचणीचे महत्त्व विमान उतरविण्यासाठी वैमानिकांना धावपट्टीवरील मार्गाचा अचूक संदेश सूचकता दर्शविणाऱ्या विज दिव्यांचा आधार घ्यावा लागतो. धावपट्टीवरील दिवे मार्गातील अचूक सूचनेमुळे वैमानिकांना धावपट्टीवरील दृष्यमानता कमी असताना याच दिव्यांच्या आधारे विमान उतरवावे लागते. त्यामुळे या चाचणीला विशेष महत्त्व आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai