Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबईत जानेवारी ते नोव्हेंबर या केवळ 11 महिन्यात 1 अब्ज 37 कोटी 80 लाख 62 हजार 317 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. तर 40 कोटी 43 लाख 44 हजार 456 एवढी रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले. 11 महिन्यात ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत अशा 62 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
गुंतवणुक करुन कमी कालावधीत भरघोस नफा देणाऱ्या फसव्या जाहिरातींना भुलून अनेक जणांची फसवणुक झाल्याचे प्रकार घडले आहेत. गरजेचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय अन्वेषण किंवा सीआयडी मधून बोलत असल्याची थाप मारत डिजिटल अटक, तुमच्या खात्यातून अतिरेक्यांना पैसे गेले आहेत अशी धमकी देत पैसे घेतले जातात. तसेच ऑनलाइन कॅमेरा चॅटिंग मध्ये अश्लील बोलून बीभत्स चाळे करण्यास भाग पाडणे आणि त्याची रेकॉर्डिंग करून पैशांची मागणी करणे असेही प्रकार घडले आहेत. यावषची आकडेवारी चक्रावणारी असून ऑनलाइन फ्रॉडचे 352 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 37 गुन्हे उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या केवळ 11 महिन्यात 1 अब्ज 37 कोटी 80 लाख 62 हजार 317 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.
गुन्हा नोंद होताच ज्या बँकेत तक्रारदाराने रक्कम वर्ग केली आहे. त्या बँकेशी संपर्क साधून तात्काळ संबंधित खाते गोठवण्यात आल्याने 40 लाख 43 हजार 44 हजार 456 रुपये वाचले आहेत. मात्र ही रक्कम मिळवणे ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. समाज माध्यमातून बदनामी करणे, अश्लील फोटो टाकणे अशा 42 तक्रारी आल्या असून त्यात 25 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.
बचावाचे सोपे नियम
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai