Breaking News
धूळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सलग 15 दिवस प्रभावी नियोजन
नवी मुंबई शहराचे स्वच्छतेतील मानांकन उंचावण्याच्या दृष्टीने लोकसहभागातून स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असतानाच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी मुख्य रस्ते व पदपथ यांची सखोल स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आलेली आहे. 30 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात विविध रस्ते सफाईच्या सखोल स्वच्छता मोहीमांचे विभागनिहाय बारकाईने नियोजन करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
डीप क्लीनिंग मोहीमेमध्ये प्रामुख्याने रस्त्यांच्या व पदपथांच्या कडेला घट्ट झालेली माती मनुष्यबळाव्दारे साफ करण्यात येत असून त्यानंतर अत्याधुनिक फॉगर्स मशीनद्वारे पाणी मारुन रस्त्यांची सफाई देखील केली जात आहे. याकरिता पालिकेच्या मलप्रक्रिया केंद्रातून शुद्ध केलेल्या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची बचत होत आहे. फॉगर्स वाहनाद्वारे रस्ते सफाई केल्याने हवेतील धुळीचे प्रमाण कमी होऊन प्रदूषणही कमी होणार आहे. याचप्रमाणे नवी मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा होत आहे. या डिप क्लीनिंग मोहिमेचा विभागनिहाय आराखडा तयार करण्यात आला असून प्रत्येक दिवशी सखोल स्वच्छता करण्याचा रस्ता व परिसर निश्चित करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचराव्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त संतोष वारुळे यांच्या माध्यमातून अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. दुर्लक्षित व पडीक जागांची तसेच पालिकेच्या अखत्यारीत नसलेल्या सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 30 डिसेंबर ते 13 जानेवारीपर्यंत सलग 15 दिवस सर्वच आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून यामुळे मुख्य रस्ते, पदपथ याठिकाणी साठलेले मातीचे थर, धूळ यांची मनुष्यबळाव्दारे तसेच यांत्रिक वाहनांव्दारे सखोल स्वच्छता होणार आहे शिवाय हवेतील धुळीचे प्रमाण कमी होउुन नवी मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारण्यासही मदत होणार आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी या सखोल स्वच्छता मोहीमेस सहकार्य करावे व आपले नवी मुंबई शहर स्वच्छ व सुंदर म्हणून मानांकित होण्यासाठी कचऱ्याचे घरातच वगकरण करणे, हा वेगवेगळा कचरा वेगवेगळया स्वरुपातच कचरा गाडीत देणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णत: टाळणे या सवयींचा अंगीकार करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai