Breaking News
नवी मुंबई ः राहुल कर्डिले, भाप्रसे यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार पूवचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांच्याकडून 31 डिसेंबर 2024 रोजी सिडको भवन येथे स्वीकारला.
राहुल कर्डिले हे सन 2015 च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशाकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. कर्डिले हे अभियांत्रिकी (इन्स्ट्रूमेन्टेशन) पदवीधर आहेत. यापूव त्यांनी अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती, सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, सेलू, जि. परभणी, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषद आणि सहआयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मुंबई ही पदे भूषवली आहेत. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूव राहुल कर्डिले हे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, वर्धा म्हणून कार्यरत होते.
वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना राहुल कर्डिले यांनी तालुका स्तरापर्यंत ई-कार्यालय या उपक्रमाची अंमलबजावणी केली होती. ई-कार्यालय उपक्रमाची तालुका स्तरापर्यंत अंमलबजावणी करणारा वर्धा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला होता. सेवादूत उपक्रमांतर्गत ग्रामस्तरीय उद्योजका (व्हीएलई) मार्फत ऑनलाइन प्रक्रिया राबवून नागरिकांना घरपोच सेवा देण्याचा पथदश प्रकल्पही त्यांनी राबविला होता. नागरिकांकरिता 90 अधिकच्या सेवा अधिसूचित करणे, 90 सेवांपैकी 27 सेवा या ऑनलाइन आरटीएस पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai