Breaking News
नवी मुंबई ः सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डींग, बॅनर्स / पोस्टर्स हे विशेष मोहीम घेऊन हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यानुसार अशा अवैध अतिक्रमण, बॅनर्सची माहिती मिळण्यासाठी पालिकेने विभागनिहाय दूरध्वनी क्रमांक उपलब्ध केले आहेत. तसेच कारवाईसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून विभागनिहाय नियुक्ती केली आहे. त्यामुळे लवकरच फुकट्या चमकोगिरी करणाऱ्यांना लगाम बसून शहर सौंद््र्याला बाधा पोहचणार नाही अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाबाबत आणि अनधिकृत होर्डींग, बॅनर व पोस्टर्सबाबत जनहित याचिका अन्वये उच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डींग, बॅनर्स / पोस्टर्स हे विशेष मोहीम घेऊन हटविण्याचे आदेशित केले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जाहिरात फलक, होर्डींग, बॅनर लावण्यासाठी पालिकेने जागा निश्चित केल्या असून त्याच जागांवर, विहित आकारमानात जाहिरात फलक, होर्डींग, बॅनर प्रदर्शित करण्यासाठी विहीत नमुन्यात विभाग कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, 1966 मधील कलमानुसार अनधिकृत बांधकाम / अतिक्रमणांवर नोटीस देऊन निष्कासनाची कारवाई करणे, निष्कासनाचा खर्च वसूल करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच तद् अनुषंगिक कारवाई करण्यात येणार आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृत इमारती / अतिक्रमणे, विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी महानगरपालिकेस देण्यासाठी विभागनिहाय दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभाग कार्यालयाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून विभागनिहाय नियुक्ती करण्यात येत आहे. नागरिक याविषयीच्या तक्रारी ... या संकेतस्थळावरील ग्रिव्हेन्स पोर्टलवर किंवा माझी नवी मुंबई या मोबाईल ॲपवर ॉरू शकतात.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai