Breaking News
नवीन वर्ष नवीन संकल्पना उपक्रमाचा भाग
नवी मुंबई : नवीन वर्ष आगमनाचे औचित्य साधून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वाशीमध्ये बुधवार दि. 1 जानेवारी रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूतने यात भाग घेत आपला सहभाग नोंदवला. ए टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, साईलीला फाउंडेशन, शिवस्वराज्य ढोल-ताशा पथक, कै. मा. आ. अण्णासाहेब पाटील उत्सव मंडळ तसेच विजय वाळुंज मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्ष नवीन संकल्पना हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वाशी सेक्टर 15 येथील ए टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आंबा, चिकू, बदाम, जास्वंद, कडूलिंब तसेच पारिजात अशा विविध प्रकारच्या फळाफुलांची 30 झाडे लावण्यात आली. 2025 या वर्षात नवीन वर्ष नवीन संकल्पना या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक पर्यावरणपूरक, सामाजिक तसेच सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे साईलीला फाउंडेशनचे सर्वेसर्वा राजेश संकपाळ यांनी सांगितले. याप्रसंगी ए टाईप ओनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai