Breaking News
5-7 राऊंड फायर करून दुक्कल फरार; एकजण जखमी
नवी मुंबई ः सानपाडा परिसरात दुचाकीवरून आलेल्या युवकांनी एका व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार केला. एकूण पाच-सात गोळ्या झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबारात जखमी व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून तब्येत स्थिर आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस एकत्रित मिळून तपास करीत आहेत. या गोळीबारामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सानपाडा रेल्वे स्थानकानजीक डी मार्टच्याजवळच आरोपींनी राजाराम ठोके यांच्यावरती गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीवरून दोन व्यक्ती आल्या त्यांनी गाडी थांबवत पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात राजाराम ठोके हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजाराम ठोके हा एपीएमसी मार्केट मधील कचरा कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदारी वरून फायरिंग झाल्याचे समजते. ही घटना ज्या याठिकाणी घडली तो परिसर कायम गद असणारा आहे. अशा गदतून गोळ्या झाडणारे आपली दुचाकी सुसाट वेगाने काढून पसार झाले.
ही माहिती मिळताच सानपाडा पोलीससह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज दहाणे यांनी घटनेला दुजोरा आहे. सानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फरार झाले आहेत. पोलीस संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दरम्यान आरोपी ज्या बाजूला गेले त्या ठिकाणचे काही सीसीटीव्ही तपासले जात आहेत.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस आणि फॉरेन्सिक टीम करीत आहेत. पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास सानपाडा परिसरातील डी-मार्टजवळ दोन आरोपींनी गोळीबार केला. या गोळीबारात राजाराम ठोके यांना 2 ते 3 गोळ्या लागल्याची शक्यता आहे. जखमी ठोके यांची तब्येत स्थिर असून, या प्रकरणी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस एकत्रित मिळून तपास करीत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai