Breaking News
नवी मुंबई ःपालिका क्षेत्रातील वायु प्रदूषण कमी करण्यासाठी 30 डिसेंबर पासून सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यास सुरुवात झाली असून शनिवार व रविवार सुट्ट्यांच्या दिवशीही प्रभावीपणे मोहिमा राबविण्यात आल्या.
या अंतर्गत दिघा विभागामध्ये एमआयडीसी रोडवर बिस्किट गल्ली हजेरी शेडपर्यंत सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच ऐरोली विभागातही दिवा सर्कल ते टी जंक्शनपर्यंत सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत रस्ते, पदपथ, दुभाजक यांच्या कडेला साठलेली माती ब्रशझाडू आणि फ्लीपर मशीनद्वारे उचलून घेण्यात आली तसेच स्प्रेईंग मशीनद्वारे रस्ते, पदपथ, दुभाजकांची त्याचप्रमाणे रस्त्यांवरील पादचारी पूल, शिल्पाकृती, बस स्टॉप यांचीही सखोल साफसफाई करण्यात आली. कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरात तसेच इतरही विभाग कार्यालय क्षेत्रात सखोल स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या.
आठही विभाग कार्यालय क्षेत्रात दिनांकनिहाय विविध रस्त्यांच्या सखोल स्वच्छेता मोहिमांचे नियोजन करण्यात आले असून आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त संतोष वारुळे तसेच परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित अधिकारी, कर्मचारीवृंद तसेच स्वच्छताकम यांच्या माध्यमातून धुळीचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सखोल साफसफाई करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai