Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिका शाळा क्र.36, कोपरखैरणेगाव येथील माजी विद्यार्थिनी कु.राबिया सागर शेख हिची ‘इंडिया खेलो फुटबॉल लीग - 2025 (आयकेएफ-4)’ साठी पश्चिम विभागाकडून संघाची कर्णधार म्हणून नुकतीच निवड झाली आहे. ही बाब नवी मुंबई महापालिकेसाठी अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तिचा विशेष सत्कार करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कु. राबिया शेख हिने यापूवही विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये सुब्रतो रॉय फुटबॉल कप उपविजेतेपद, डीएसओ फुटबॉल स्पर्धा विजेतेपद, मुंबई फुटबॉल लीग - विजेतेपद, टीएफसी ठाणे फुटबॉल लीग विजेतेपद - अशा अनेक स्पर्धांचा समावेश आहे.
तिला फुटबॉल प्रशिक्षक रोहन जगताप, ज्ञानेश्वर घुगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच संघ व्यवस्थापक योगेश सुर्वे, कुणाल कोषटवार, अश्विनी सावले यांचेही वैयक्तिक मार्गदर्शन लाभले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व शिक्षक प्रशांत गाडेकर यांचेही उत्तम सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे. नमुंमपा शाळा क्रमांक 36 कोपरखैरणे गाव येथील विद्यार्थ्यांसाठी राबियाने प्रेरणादायी कामगिरी केली असून तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai