Breaking News
व्यवस्थापकीय संचालकांचे अधिकाऱ्यांना निर्देश
नवी मुंबई ः सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा सिडको भवन येथे एका महत्वपूर्ण बैठकीत विस्तृत आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महागृहनिर्माण योजना, नैना व अन्य महत्वपूर्ण प्रकल्पांबद्दल चर्चा केली. सिडकोतर्फे हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सद्यस्थिती, असलेली आव्हाने आणि प्रकल्पांच्या वेगाने अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली पाऊले याबाबत विजय सिंघल यांनी आढावा घेतला.
सिडको नेहमीच जागतिक दर्जाच्या पायाभूत सेवा सुविधा पुरविण्याबाबत कटिबध्द राहिली आहे. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व जाहीर करण्यात आलेली महागृहनिर्माण योजना याबाबत सर्व संबंधित भागधारकांमध्ये आवश्यक असलेला समन्वय व पारदर्शकता याबाबत उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण निर्देश दिले व प्रकल्पाच्या निश्चित झालेल्या मुदतीत सर्व प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यास सांगितले. या बैठकीत शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, राहुल कार्डिले, सहव्यवस्थापकीय संचालक, गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक तसेच संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले विविध महत्वाकांक्षी प्रकल्प नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता महत्वपूर्ण आहेत. प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानाकारक असून प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता कालमर्यादेमध्ये कामे पूर्ण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. - विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai