Breaking News
नवी मुंबई : मुंबई माग थेट डोंबिवली आणि कल्याणकडे जाणाऱ्या ‘ऐरोली-कटाई’ उन्नत मार्गाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामात अडथळा असलेल्या ऐरोली पोस्ट कार्यालयाजवळील दुसऱ्या उच्च दाबाच्या मोनोपोल इलेक्ट्रिक टॉवरचे काम पुर्ण झाल्याने आता पुलाच्या पुढील कामाला वेग येणार आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत या पुलाचे काम पुर्ण करण्याचे ध्येय एमएमआरडीएने ठेवले आहे.
मुंबई व नवी मुंबईला कल्याण-डोंबिवलीसह भिवंडी आणि अंबरनाथ-बदलापूरला जोडणारा हा पुल फ्री-वे प्रवासासाठी खुला झाल्यानंतर कटाई नाक्यापर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांचा होणार आहे. मुंबईतून थेट प्रवासाठी एमएमएआरडीएने मे 2018 मध्ये ऐरोली-काटई उन्नत मार्गाच्या कामाचा श्री गणेशा करण्यात आला.पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग (जोड) क्रमांक 4 हा 3.43 किमीचा मार्ग बनवणे आणि दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता बनविण्याचे नियोजन करण्यात आले. कोरोनाचा कालावधीत रखडलेले काम त्याच बरोबर सिडको, वनविभाग आणि सीआरझेडची परवानगी, रेल्वे ट्रॅकवर गर्डरसाठी परवानगी, वृक्षछाटणी परवाना, खाडी-पूल विभागाचा परवाना अशा अनेक प्राधिकृत परवान्यांची कसरत पूर्ण करत ऐरोली-कटाई उन्नत मार्ग अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे.
या ठिकाणी महावितरणच्या केबल वाहक विद्युत वाहिन्या जुनाट आणि कमी उंची असल्याने अडसर निर्माण झाला होता. भविष्यात अवजड उंच वाहनांची वर्दळ सुरु झाल्यास होणारा त्रास आणि गर्डर टाकण्याकरीता उन्नत मार्गातील ऐरोली सेक्टर-3 पोस्ट कार्यालयाजवळ पालिकेच्या उद्यानातून गेलेल्या विद्युत वाहिन्या काढून चार ठिकाणी नव्याने मोनोपोल इलेक्ट्रिक टॉवर उभारण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 16 पीएससी आय गर्डर बसविण्यात आले आहेत. तर 15 दिवस वाहतूक व्यवस्थेत बदल करुन मोनोपोल टॉवर उभारला आहे. त्यामुळे आता ऐरोली रेल्वे स्थानकानजीक गर्डर टाकल्यानंतर उन्नत मार्गातील अत्यंत महत्वाचा टप्पा पुर्ण होणार आहे, अशी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai