Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा शासन निर्णय गुरुवारीजारी करण्यात आला. त्यामुळेआता सिडकोच अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. मात्र, महायुतीच्या सरकारचा कार्यकाळ संपण्यापूव संजय शिरसाट यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. होतं. त्याचप्रमाणं भरत गोगावले यांना देखील राज्य परिवहन महामंडळाचं अध्यक्ष केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री झाले आहेत. संजय शिरसाट यांनी मंत्रिपदी निवड झाल्यानंतर सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतरही शिरसाट हे सिडकोच्या अध्यक्षपदावर कायम होते. गुरूवारी शासन निर्णय जारी करत संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर नियमानुसार सिडकोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्ठात आला असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांच्याकडील सिडकोचा कार्यभार संपुष्टात आणण्यात आणला आहे.
आता लवकर सिडकोच्या नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल. सिडकोचे अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहणार की मित्रपक्षांकडे जाणार हे पाहावे लागेल. याशिवाय मुंबईसह इतर शहरातील आमदारांनी देखील सिडकोच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरु केल्याची चर्चा आहे. .
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai