Breaking News
15 हजार दंड वसूली
नवी मुंबई ः प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. प्रतिबंधीत प्लास्टिक जप्त करण्यासोबतच दंडात्मक वसूलीही करण्यात येत आहे. घणसोली विभागातून 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करुन 15 हजार दंड वसूली करण्यात आली.
परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. संजय तायडे यांच्या माध्यमातून घणसोली विभागातील दुकानांमध्ये अचानक जाउुन प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकची तपासणी केली. यामध्ये रॉयल फरसाण घणसोली, दिनेश फरसाण घणसोली व शिवशक्ती मार्ट घणसोली या तीन दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांच्या कडून प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे एकूण 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्यासोबतच 30 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai