Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबईत प्रथमच जागतिक कीतच्या ‘कोल्डप्ले’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ते 21 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असून जागतिक कीतच्या कलावंतांचा सहभाग या असणार आहे. त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टिने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. तसेच कुठेही रस्त्याच्या कडेला जड अवजड वाहन पार्क करण्यास मनाई आदेश देण्यात आले आहेत.
‘कोल्डप्ले’ या संगीत रजनीचा कार्यक्रम नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणावर गद होणे अपेक्षित आहे. संगीत क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. कार्यक्रमनिमित्त येणाऱ्या नवी मुंबईत हजारो वाहनांची भर या दिवसांत पडणार आहे. कार्यक्रमा दिवशी स्टेडियमला येणारे कलावंत व महत्वांच्या व्यक्ती व प्रेक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव व वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास मनाई आदेश देण्यात आले आहेत. तसेच जड अवजड वाहनांना कुठेही पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. तशी अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली आहे. ही अधिसूचना जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, शासकीय वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना तसेच कार्यक्रम व्यवस्थापनाचे अधिकृत पासधारक वाहने यांना लागू होणार नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai