Breaking News
बेलापूर-पेंधर मेट्रो मार्गावर 20 जानेवारीपासून सुधारित वेळापत्रक लागू
नवी मुंबई ः सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्ग क्र. 1 वर 20 जानेवारी 2025 पासून मेट्रोच्या फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक लागू होणार असून सकाळी आणि सायंकाळी सर्वाधिक गदच्या वेळी दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने गदच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गावर 17 नोव्हेंबर 2023 पासून मेट्रो सेवेचे परिचालन सुरू झाले असून या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सर्वाधिक गदच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव मेट्रो फेऱ्यांचा लाभ व्हावा याकरिता सदर मार्गावर 20 जानेवारी 2025 पासून मेट्रो फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, बेलापूर आणि पेंधर स्थानकांतून सकाळी 06.00 वाजेपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे.
बेलापूर येथून रात्री 22.00 वाजता व पेंधर येथून रात्री 21.45 वाजता मेट्रोची शेवटची फेरी धावणार आहे. सर्वाधिक गदच्या वेळेत बेलापूर येथून सकाळी 07.30 ते 10.00 आणि सायंकाळी 05.30 ते 08.00 तर पेंधर येथून सकाळी 07.00 ते 09.30 आणि सायंकाळी 05.00 ते 07.30 दरम्यान दर दहा मिनिटांनी मेट्रोची फेरी होणार आहे. सर्वाधिक गदच्या वेळा वगळता उर्वरित वेळांमध्ये बेलापूर व पेंधर येथून दर 15 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai