Breaking News
नवी मुंबई ः मागील 20 वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनचे 2025 हे द्विदशकपूत वर्ष असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी यामध्ये सलग दहाव्या वष सहभागी होत 42.195 किलोमीटरचे मुख्य मॅरेथॉनचे अंतर 4 तास 29 मिनिटे 12 सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
जगभरातील मॅरेथॉनमध्ये मुंबई मॅरेथॉन ही एक मानाची मॅरेथॉन समजली जात असून यामध्ये सहभागी होणे हे अनेक धावपटूंचे स्वप्न असते. पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून प्रारंभ झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये 6 मिनिटे 23 सेकंद प्रति किलोमीटर वेगाने धाव घेत डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबई मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. नुकतेच जून महिन्यात त्यांनी जागतिक स्तरावरील मानाच्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये 86.6 किलोमीटर अंतर निर्धारित वेळेच्या आधीच 11 तास 10 मिनिटे 56 सेकंदात पूर्ण केले होते.
अत्यंत महत्त्वाची अशी प्रशासकीय जबाबदारी व व्यस्त दिनक्रम असूनही त्यांनी कधीच धावण्याच्या सरावात खंड पडू दिला नाही. आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याची जिद्द व त्यासाठी अथक परिश्रम आणि सुयोग्य नियोजन या त्रिसूत्रीच्या बळावर धावण्याच्या आवडीतून आरोग्यपूर्ण जीवनाचा मंत्र अंगिकारत आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे सातत्याने यश मिळवत असून मुंबई मॅरेथॉनमधील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन आणि प्रशंसा करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai