41 वा स्काऊट गाईड भव्य मेळावा दिमाखात संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 22, 2025
- 474
उरण ः उरण तालुक्यातील द्रोणागिरी पर्वत पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या श्रीशैल्य प्रकल्प डाऊरनगर परिसरात रायगड भारत स्काऊट व गाईड भव्य मेळावा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सदर चार दिवसीय निवासी मेळावा इयत्ता 5वी ते 7वी व 8वी ते 10वी या दोन गटात घेण्यात आला. या मेळाव्यात 537 विद्याथ व 63 शिक्षक असे एकूण 600 कब बुलबुल कब लीडर व क्लाफ लीडर सहभागी झाले होते.
41 वर्षातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा मेळावा म्हणून रायगड जिल्हा भारत स्काऊट गाईड व कब-बुलबुल मेळावा वेगवेगळ्या दानशूर दात्यांच्या सहकार्याने संपन्न झाला. सदर मेळावा रायगड भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालय व रायगड जिल्हा शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने 16 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत हा चार दिवसीय निवासी मेळावा इयत्ता 5वी ते 7वी व 8वी ते 10वी या दोन गटात घेण्यात आला. पहिल्या दिवशी कार्यालयीन ध्वजारोहण, आगमन, तंबूरचना, मार्गदर्शन, संचलन, रात्री शेकोटी कार्यक्रमात मुलांचे व सामुहिक सांस्कृतिक कार्यक्रम व दिवेबंद पहारा असा दिनक्रम होता. तर पुढील दिवसात रामधुन बीपी सिक्स, तंबू स्वच्छता, तंबूनिरीक्षण, ध्वजारोहण, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, रात्री शेकोटी कार्यक्रम, द्रोणागिरी किल्ला हाईक, गावची जत्रा, उरण शहर शोभायात्रा, सर्वधमय प्रार्थना, तर 18 जानेवारी 2025 रोजी कब बुलबुल साठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 537 विद्याथ व 63 शिक्षक असे एकूण 600 कब बुलबुल कब लीडर व क्लाफ लीडर सहभागी झाले होते.
विविध नाविन्यपूर्ण स्पर्धा राबवून हा मेळावा संपन्न झाला. या चार दिवसात अनेक मान्यवरांनी भेटी देऊन विद्याथ शिक्षक व आयोजक, रायगड युनिटचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले. या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संतोषजी शेडगे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक अलिबाग यांच्या संकल्पनेतून स्काऊट- गाईड व कब-बुलबुलच्या रायगड इतिहासात पहिल्यांदाच रायगड जिल्हा परिषद पी.एम.श्री.13 शाळा व अन्य 19 शाळा सहभागी झाल्या होत्या. जवळजवळ 650 स्काऊट- गाईड व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक स्काऊटर- गाईडर व नियोजन समिती असे मिळून 800 लोक दररोज निवासी स्वरूपात रहात होते. विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना उत्तेजित करण्यासाठी तसेच शिस्त व स्वावलंबनाला चालना देण्यासाठी हा मेळावा निश्चित फलदायी ठरणारा असा होता. विद्यार्थ्यांनी चार दिवस विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या प्राविण्याचा गुण गौरव शेवटच्या दिवशी करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त स्काऊट गाईड व शाळांचा गुणगौरव करण्यात आला. तर लहान गट व मोठा गट यामध्ये सर्वाधिक बक्षीसे प्राप्त करणारी शाळा डेविड इंग्लिश मिडीयम स्कूल चोंढी अलिबाग या शाळेला दोन्ही गटात या वर्षाचा चॅम्पियन ट्रॉफी मिळवण्याचा मान मिळाला. या शाळेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन व कौतुक करण्यात आले व चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. जिल्ह्यातून एका बेस्ट स्काऊट- स्काऊटर व बेस्ट गाईड- गाईडर पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai