Breaking News
उरण ः रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा समाजातील राष्ट्र निर्मिती करता करण्यात येणाऱ्या कामाच्या व सेवेच्या आधारावर नेशन बिल्डर अवॉर्ड देण्यात येत असतो. या वर्षाचा नेशन बिल्डर अवॉर्ड उरण तालुक्यातील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सी बर्ड स्टेशन मुलांची शाळा उरण या शाळेतील मुख्य शिक्षिका पल्लवी संतोष परदेशी यांना मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
2009 पासून या शाळेमध्ये विशेष शिक्षिका म्हणून काम करत आहेत. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून बीए बीएड स्पेशल एमआर, डीसीएसी एमआर, शिक्षण असलेल्या पल्लवी मॅडम यांना उत्कृष्ट नेतृत्व, नवोन्मेष आणि सामाजिक प्रगतीसाठी समर्पणाद्वारे राष्ट्र उभारणीत समाजासाठी काहीतरी विशेष असं करण्याची धडपड आवड त्यांना होतीच म्हणून त्यांनी विशेष शिक्षण पूर्ण करून नोकरी स्वीकारली. मुलांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्याचे कौशल्य आणि मुलांना आत्मनिर्भर करणे हा त्यांच्या कामातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांना त्यांच्या कामानिमित्त यापुव कर्तुत्वान महिला, उरण भूषण, आदर्श शिक्षिका इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना नेशन बिल्डर अवॉर्ड 2025 ने सन्मानित करत असताना पुन्हा एकदा त्यांना समाजाने राष्ट्र निर्मितीची संधी दिली आहे. हा पुरस्कार दिनेश मेहता - डिस्टिक गव्हर्नर रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई सीबीडी बेलापूर यांच्या शुभहस्ते 19 जानेवारी 2025 रोजी बेलापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स येथे मोठ्या दिमाखात प्रदान करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai