Breaking News
इंदोर, सुरत तर महाराष्ट्रातील नवी मुंबई हे एकमेव शहर
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2024 चे टूलकिट प्रकाशित करताना शहरी विकास मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री ना. मनोहरलाल खट्टर यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2024 करिता आजवरच्या स्वच्छ सर्वेक्षणात सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या उच्चत्तम शहरांकरिता सुपर स्वच्छ लीग ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण करीत असल्याची घोषणा केली. यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर शहरांच्या पाच श्रेणी निवडण्यात आल्या. त्यामधील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या देशातील प्रमुख शहरांच्या मुख्य गटात 3 शहरांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे.
सुपर स्वच्छ लीग गटामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, मध्य प्रदेशातील इंदोर आणि गुजरातमधील सुरत या तीन शहरांचा समावेश आहे. या तीन शहरांनी सातत्याने स्वच्छतेमध्ये अग्रक्रम राखला असून त्यांची स्वतंत्र कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे. सुपर लीगमध्ये समावेश झाल्याने स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये गुणांकनाचे स्वरुप बदलले असून आता 10 हजार गुणांचे मूल्यमापन आहे. त्या गुणांच्या वर्गवारीमध्ये प्रत्यक्ष दर्शनी स्वच्छतेला 1500 गुण, घन कचऱ्यावरील शास्त्रोक्त प्रक्रियेकरिता 1500 गुण तसेच जनजागृती उपक्रमांकरिता 1500 गुण असणार आहेत. त्याचप्रमाणे वगकृत कचरा संकलनाकरिता 1000 गुण, शौचालय व्यवस्थापना करिता 1000 गुण, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्उपयोगाकरिता 1000 गुण व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन कचरा व्यवस्थापन सुधारणेकरिता 1000 गुण असणार आहेत. तसेच लोकांकडून प्राप्त तक्रार निवारणासाठी 500 गुण, मलनि:स्सारण प्रक्रेियेकरिता 500 गुण आणि स्वच्छताकमकरिता कल्याणकारी कामांसाठी 500 गुण अशाप्रकारे एकूण 10,000 गुणांनुसार सर्वेक्षण केले जाणार आहे. याशिवाय कचरामुक्त शहर मानांकनाकरिता 2500 गुण व ओडीएफ वॉटर प्लस मानांकनाकरिता 2500 गुण ग्राह्य धरले जाणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये शालेय स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाणार असून स्वच्छ आणि कचरामुक्त शाळा, शाळांमधील कचरा वगकरण आणि कंपोस्ट पीट्सचा वापर, विद्याथ व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व्यवस्था अशा विविध बाबींची बारकाईने पाहणी करण्यात येणार आहे. शहरातील पर्यटन स्थळे, स्मारके व परिसर स्वच्छता या बाबीही महत्वाच्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai