Breaking News
रंगभूमीवर विविध उपक्रम राबवणार - रवींद्र वाडकर
नवी मुंबई ः नवी मुंबईतील कला क्षेत्रात अविरतपणे कार्य करणाऱ्या मोहिनी आर्ट अकॅडमीने 25 व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये एकांकिका, दीर्घांक, अल्बम साँग, लघुपटाची निर्मिती करून या विविध उपक्रमातून नवोदितांना संधी देण्याचा मानस यावेळी अकॅडमीचे संचालक जेष्ठ साहित्यिक व रंगकम रवींद्र चिमाजी वाडकर यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील कलाकार हे तंत्रज्ञ बालनाट्य, एकांकिका, दीर्घांक, व्यवसायिक नाटक, अशा विविध क्षेत्रात, मोहिनी आर्ट अकॅडमीचे संचालक जेष्ठ साहित्यिक व रंगकम रवींद्र चिमाजी वाडकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली अविरतपणे रंगभूमीची सेवा करीत आहेत. मोहिनी आर्ट अकॅडमीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीपासूनच रसिक प्रेक्षकांकरीता कलाआविष्कार सादर करण्यास प्रारंभ केला आहे. आजतागायत संस्थेच्या माध्यमातून मराठी नाट्य, मालिका व चित्रपट सृष्टीला अनेक कलाकार मिळवून दिले आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला मोहिनी आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून रवींद्र वाडकर लिखित मअर्धरात कललीफ या दीर्घांकाचे अभिवाचन सादर करण्यात आले. या अभिवाचन कार्यक्रमाप्रसंगी देवेंद्र भुजबळ माजी आयुक्त भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन, अभिनेता चित्रपट निर्माते सुनील तांबे, चित्रपट निर्मात्या लिलावती अंबावले, आयाम परफॉर्मिंग स्पेसच्या संचालिका वैशाली पाटील उपस्थित होते.
दीर्घांक अभिवाचन सादरीकरण करण्यासाठी वैशाली पाटील, दिव्या चौधरी - पगार, आरती गुरव, यश आर्या, योगेश कांबळी आणि रवींद्र वाडकर यांचा सहभाग होता. या अभिवाचनाला सुनील पगार यांनी संगीत संयोजन केले होते. सदरच्या अभिवाचन करण्यात आलेले दीर्घांक लवकरच रसिकप्रेक्षकांना रंगभूमीवर पहायला मिळणार असल्याची घोषणा रवींद्र वाडकर यांनी केली. तर, या प्रसंगी रवींद्र वाडकर लिखित मअर्धरात कललीफ या गीताचा ऑडिओ आणि मवाट रानातून चालेफ या गीताचा अल्बम व्हिडीओचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमास आयाम परफॉर्मिंग स्पेस, सानपाडा यांचे सहकार्य लाभले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai