Breaking News
सुरेंद्र डंगवाल यांना नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री किताब
नवी मुंबई ः नवी मुंबईतील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूंना आपले क्रीडा प्रदर्शन करण्याची संधी मिळावी या दृष्टीने राज्यस्तरीय स्पर्धेप्रमाणेच ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ देखील आयोजित करण्यात येते. यंदा ‘नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा’ यामध्ये पुणे जिल्ह्याच्या शशांक वाकडे या शरीरसौष्ठवपटूने बहुमान पटकावला. तर ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ यामध्ये सुरेंद्र डंगवाल यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ हा प्रथम क्रमांकाचा चषक संपादन केला.
नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 1996 सालापासून सातत्याने आयोजित केली जात आहे. अशाच प्रकारची यावषची स्पर्धा विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये राज्यभरातील तसेच नवी मुंबईतील 200 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी पूर्ण क्षमतेने सहभागी होत यशस्वी केली. ‘नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा’ यामध्ये पुणे जिल्ह्याच्या शशांक वाकडे या शरीरसौष्ठवपटूने नवी मुंबई महानगरपालिका राज्यस्तरीय श्री बहुमान पटकावला. सोलापूर जिल्ह्याचे शरीरसौष्ठवपटू पंचाक्षरी लोणार यांनी उपविजेतेपद संपादन केले. मुंबई जिल्ह्याचे निलेश दगडे यांनी ‘मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर’ किताब तसेच पालघर जिल्हयाच्या लकपा लामा यांनी बेस्ट पोझर किताब मिळविला. 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो व 85 किलोवरील अशा 8 वजनी गटातील प्रत्येकी सहा विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
त्याचप्रमाणे ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ यामध्ये सुरेंद्र डंगवाल यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ हा प्रथम क्रमांकाचा चषक संपादन केला. शरीरसौष्ठवपटू प्रशांत गुरव यांनी उपविजेतेपद पटकाविले. 50 किलो, 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो व 70 किलो पुढील अशा विविध वजनी गटांत प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे 5 विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai