Breaking News
300 हून अधिक प्रकल्पांचा समावेश
नवी मुंबई : घराची स्वप्नपूत करण्यासाठी नवी मुंबईतील सिवूड्स येथील तांडेलमैदानात 24 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत क्रेडाई बीएएनएम, रायगड यांच्या वतीने 23 वे मेगा प्रॉपट प्रदर्शन सुरु झाले आहे. राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, बीएएनएमचे अध्यक्ष वसंत भद्रा, पालिका आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. यामध्ये सूमारे 100 विकासकामार्फत 300 हून अधिक प्रकल्पांचा समावेश असणार आहे.
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांच्या बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बीएएनएम) व क्रेडाई बीएएनएम, रायगड यांच्या वतीने यंदाही आपल्या स्वप्नातील घर घेणाऱ्यांसाठी आणि प्रॉपट गुंतूवणूकदारासाठी भव्य प्रॉपट प्रदर्शन सुरु झाले आहे. सिनेअभिनेत्री यामी गौतम हिने या प्रदर्शनाला हजेरी लावून प्रदर्शनाचे कौतुक केले. पहिल्याच दिवशी नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.
नवी मुंबई आणि रायगड झपाट्याने विकसित होत आहे. नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, कोस्टल रोड, पनवेल -बदलापूर टनेल, वडोदरा -जेएनपीटी हायवे प्रोजेक्ट, खारघर -तुर्भे लिंक रोड, ऐरोली -कटाई नाका फ्रिवे, चिरनेर ते चौक रोड प्रोजेक्ट, तळोजा - बेलापूर कोस्टल रोड, टीपीएस आणि नैना प्रोजेक्ट, नविन खोपोली इंडस्ट्रीअल बेल्ट, ऐरोली नॉलेज पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर खारघर, नेरुळ सायन्स पार्क, वाशी डेपो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मेरिटाईम युनिव्हर्सिटी, खारघर गोल्फ कोर्स आदि महत्वाकाक्षी प्रकल्प सुरु असून इथं घर घेण्याची संधी खाजगी बिल्डर्सनी उपलब्ध करून दिली आहेत. या प्रदर्शनात 15 लाखापासून 25 करोड किंमत असलेली घरे आणि फ्लॅट उपलब्ध असून घरांची बुकिंग करणाऱ्या साठी लकी ड्रॉ देखील आहे.
सदर मेगा प्रॉपट प्रदर्शन प्रसंगी बीएएनएमचे अध्यक्ष वसंत भद्रा, सचिव जिगर त्रिवेदी, भूपेंद्र शहा, ई वी होम्सचे विकी थॉमस, कोषाध्यक्ष करण सबलोक, शैलेश पटेल, प्रवीण पटेल, हितेश गामी, महेश पटेल, झुबिन संघोई आणि पॅराडाईज ग्रुपचे मधू भतिजा व मनिष भतिजा, जितू सोनी आदि नामांकित बिल्डर उपस्थित होते.
सिवूड्स येथील मेगाप्रॉपट प्रदर्शनातून कनेक्टिंग नवी मुंबई व विमानतळाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. एनआरआय, नेरुळ पामबीच, खारघर, नेरळ, खोपोली, कर्जत, रोहिंजण, तळोजा, पुष्पकनगर, द्रोणागिरी, उरण, उलवे, पामबीच- सानपाडा, ऐरोली आदी ठिकाणी महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्प निर्माण करत असलेल्या शेकडो बिल्डर्सनी प्रॉपट प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. -मनीष भतीजा, पॅराडाईज ग्रुप
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai