Breaking News
नवी मुंबई : नैना प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असताना नैना प्रकल्पाची नगर रचना परियोजना क्रमांक 12 च्या योजनेवर हरकत घेतलेल्या 1064 शेतकऱ्यांच्या सुनावणीचे वेळापत्रक सिडकोने गुरुवारी जाहीर केले. 27 जानेवारी ते 24 मार्चपर्यंत ही सुनावणी लवादामार्फत घेतली जाणार आहे. नैना प्रकल्पाचे कोणतेही काम थांबणार नाही, अशीच भूमिका या सुनावणीच्या वेळापत्रकातून सिडकोने जाहीर केली आहे.
नैना परियोजना क्रमांक 12 साठी एस. व्ही. सुर्वे या लवादांची नियुक्ती केली आहे. ही योजना जाहीर केल्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या. भारतीय शेतकरी कामगार पक्ष आणि गावठाण विस्तार हक्क समिती यांच्या पदाधिकाऱ्यांनी नैना प्रकल्प होत असलेल्या गावागावांमध्ये बैठका घेऊन नैना प्रकल्पाविरोधात लढा उभारला. शेतकऱ्यांना त्यांचा भूखंड स्वरुपात मोबदला देण्यापूवच नैना प्रकल्पामध्ये सिडको मंडळाने साडेसहा हजार कोटी रुपयांची विकासकामे विविध कंपन्यांना वाटप केले आहे. रस्ते, पावसाळी नाले, मलनिस्सारण वाहिनी भूमिगत करणे अशी विविध कामे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय सिडकोने जाहीर केल्याने शेतकरी संतापले आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील बाधितांना 22.5 टक्के विकसित भूखंड आणि आर्थिक मोबदला मिळाल्याने नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांना विमानतळ बाधितांप्रमाणे पॅकेजची मागणी होत आहे. राज्य सरकारला आणि सिडको मंडळाला कोणतेही संपादन न करता नैना प्रकल्प 40 गावांमधील शेतजमिनींवर राबवायचा असल्याने शेतकरी संतापले आहेत. गुरुवारी नैना परियोजना क्रमांक 12 मध्ये वाकडी, उमरोली, चिंचवली तर्फे वाजे, उसल (बुर्दुक), रिटघर, ओवळे, मोरबे, कोंडले, महाळुंगी या गावांचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांनी सिडको मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना भेटून नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर काम करण्यापूव शेतकऱ्यांना या प्रकल्पातून किती भूखंड मिळणार तो कुठे मिळणार याची शाश्वती पटवून द्या, नंतरच नैना प्रकल्पाची विकासकामे सुरू करण्याचे सांगीतले होते. मात्र सिडकोने त्यांची कायदेशीर प्रक्रिया सुरूच ठेवली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai