Breaking News
नवी मुंबई ः नेरूळ येथील डॉ. डि.वाय.पाटील स्टेडिअममध्ये दि. 18, 19 व 21 जानेवारी रोजी संपन्न झालेला कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय संगीतमय कार्यक्रमाच्या चार दिवसांमध्ये तब्बल 82 टन 150 किलो इतका मोठया प्रमाणावरील कचरा स्टेडिअम परिसर व व नेरुळ विभागातून रात्री 10 ते सकाळी 3 वाजेपर्यंत चारही दिवस विशेष मोहीम राबवून संकलीत करण्यात आला. त्यामुळे नवी मुंबईच्या स्वच्छतेविषयी जागरुकतेचे नवी मुंबईकर नागरिक व कार्यक्रमासाठी आलेले विश्वभरातील संगीत रसिक यांनी कौतुक केले.
संकलीत कचऱ्यामध्ये 33 टन 375 किलो ओला कचरा व 48 टन 475 किलो सुका कचरा असा एकूण 82 टन 150 किलो कचरा गोळा करुन महानगरपालिकेच्या शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला. यामध्ये दिनांकनिहाय
अशाप्रकारे एकूण 82 टन 150 किलो कचरा संकलीत करुन वाहून नेण्यात आला.
याशिवाय स्टेडिअमच्या अंतर्गत भागातील स्वच्छताकम यांनी संकलीत केलेला 20 टनाहून अधिक कचराही प्रक्रियेसाठी नेण्यात आला. त्यासाठी कचरा वाहतुक वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्या नियोजनानुसार कार्यक्रम स्थळाच्या अंतर्गत भागात दुपारी 2 वाजल्यापासून 150 हून अधिक परिसर सखींच्या सहयोगाने कचऱ्याचे वगकरण तीन दिवस सुरू ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक दिवशी 10.30 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत 100 हून अधिक स्वच्छतामित्रांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. लाखो लोकांच्या उपस्थितीत झालेला हा बिग इव्हेंट असूनही सकाळी कार्यक्रम स्थळाच्या परिसरातील रस्ते स्वच्छ पाहून नागरिकांनी कौतुक केलेच शिवाय प्रसार माध्यमांनीही या तत्पर स्वच्छता कार्यवाहीची विशेष नोंद घेतली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai