Breaking News
नवी मुंबई : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने भारतातील पहिली स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणाली, एसएसआय मंत्र प्रस्तुत करून आरोग्य सेवेमध्ये आणखी एक मानक स्थापित केले आहे. ही स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणाली प्रोस्टेट, मूत्राशय आणि किडनी, गर्भाशय, गर्भाशयाचे मुख (सर्विक्स), हृदय, पोट आणि ईएनटीच्या सर्वात गुंतागुंतीच्या सर्जरीसाठी प्रगत उपाय प्रदान करेल.
रुग्ण-केंद्रित देखभालीसाठी ओळखले जाणारे हे रुग्णालय जुलै 2018 मध्ये सुरु करण्यात आले आणि तेव्हापासून आजतागायत आपल्या रुग्णांना लक्षणीय परिणाम मिळवून देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रस्तुत करण्यात सर्वात आघाडीवर आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई हे देशातील पहिले असे रुग्णालय आहे ज्याने प्रोस्टेट, किडनी आणि मूत्राशयाच्या कँसरच्या रुग्णांवर उपचारांसाठी 2600 पेक्षा जास्त रोबोटिक सर्जरी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या रुग्णालयाने रुग्ण आणि सर्जन्ससाठी कमीत कमी इन्वेसिव सर्जरीची नवी व्याख्या रचली आहे, प्रगत रोबोटिक सर्जिकल सिस्टीमसह पारंपरिक सर्जरीच्या सीमा रुंदावल्या आहेत, ज्यामुळे या क्षेत्रात समर्पित प्रशिक्षित तज्ञ तयार झाले आहेत. आता नवी मुंबईमध्ये एसएसआय मंत्र लॉन्च करून या रुग्णालयाने सुलभ व अचूक सर्जिकल पर्याय देणारे, रोबोटिक सर्जरीमध्ये आघाडीचे म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
एसएस इनोव्हेशनने विकसित केलेल्या एसएसआय मंत्र रोबोटिक सर्जरी सिस्टीमला सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने अनुमती दिलेली आहे आणि हे अत्याधुनिक तंत्र सर्जिकल प्रिसिजनला नवा अर्थ प्रदान करण्याचे वचन देते. एसएसआय मंत्र बहुउपयोगी आहे आणि टेलिसर्जरी व टेलिप्रॉक्टरिंग यासारख्या प्रगत सुविधांना एकत्र करत अनेक विशेषतांना सहायक ठरते. 40 पेक्षा जास्त रोबोटिक एंडो-सर्जिकल उपकरणांसह सर्जन युरॉलॉजी, गायनॅकोलॉजी, कार्डिओलॉजी आणि सामान्य सर्जरीमध्ये गुंतागुंतीच्या केसेस सोडवू शकतात. कमीत कमी इन्वेसिव प्रक्रियांना सक्षम करून, ही सिस्टिम रिकव्हरीला लागणारा वेळ कमी करते, उपचार वेगाने होऊ शकतात, वेदना व सर्जरीच्या खुणा कमी होतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो. याची मॉड्युलर मल्टी-आर्म सिस्टिम, 32-इंच 3 4 मॉनिटर आणि एर्गोनॉमिक डिझाईन अचूकता, नियंत्रण आणि सुरक्षा सुनिश्चित करते.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक आणि सीईओ डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, ‘आमच्या नवी मुंबईतील रुग्णालयामध्ये भारतातील पहिली स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणाली सुरु करून,आम्ही आमच्या रुग्णांच्या फायद्यासाठी नवनवीन गोष्टींचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. ही प्रणाली, आमच्या अत्याधुनिक पायाभूत सोयीसुविधा आणि मल्टी-डिसिप्लिनरी वैशिष्ट्यांसह आम्ही आरोग्यसेवेमध्ये नवीन मानक स्थापित करून सर्जिकल प्रिसिजनमध्ये नवीन परिवर्तन घडवून आणू.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai